जळगाव, दि.२४ – वृक्ष सावलीसह फळ देतात. जैवविविधता वृक्षांमुळे जपली जाते. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी कृतिशीलपणे प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाची चळवळ सुरू असुन आज वाघनगर परिसरातील बौध्द समाज मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड बोलत होत्या.
फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन संगोपनाच्या या उपक्रमात राष्ट्रापाल सुरळकर, आई स्व. कलावती नन्नवरे यांच्या स्मरणार्थ बी एम फाऊंडेशनचे संस्थापक व मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे यांनी सहभाग घेत समाजात आदर्श घालून दिला. आयुक्त विद्या गायकवाड यांच्याहस्ते महाबोधी वृक्षाचे विधीवत पूजन करून वृक्षारोपणाची सुरूवात करण्यात आली. पंडीत सपकाळ बाबा यांनी महाबोधी वृक्षपूजन करून घेतले.
यावेळी प्रा. ईश्वर वाघ यांनी त्रिशरण पंचशील घेतले. ॲड. जमिल देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकूमार वाणी, देविदास ढेकळे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, सावखेडा ग्रा.पं. सदस्या माया अहिरे, पितांबर अहिरे, मनपा सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक आबा पवार, सेवानिवृत्ती प्राचार्य भगवान नन्नवरे, नगरसेवक बंटी जोशी, डाॕ. अनिल शिरसाळे, तलाठी राहुल अहिरे, राष्ट्रपाल सुरळकर, प्रविण सपकाळे, प्रा. पी. एन. पवार, सिध्दार्थ सोनवणे, विनोद अहिरे, अजित भालेराव, सुनील साळवे, चंद्रमणी सोनवणे, वंदना बि-हाळे, उषा सपकाळे, विशाखा हनवते, साधना हिरोळे उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित मान्यवरांसह स्थानिक रहिवासींतर्फे निंब, पिंपळ, करंज, कदम, पेल्ट्रोफाॕर्म, गुलमोहर, शिसम, ज्वास्वंद, चांदणी, कन्हेर, चिंच, बकूळ, बदाम अशी १५० च्यावर झाडे लावली. यासाठी जैन इरिगेशनच्या गार्डन टिमचे मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, बबन गवळी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन प्रा. ईश्वर वाघ यांनी केले. आबा पवार यांनी आभार मानले.