जळगाव, दि. ०७ – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव व एस्ट्रल एज्युकेशन लिमिटेड व क्विन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट आयर्लंड यांच्यात गुरूवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये विद्यार्थी व शिक्षक यांचे आदानप्रदान, परदेशात शिक्षणासाठी मिळणार्या शिष्यवृत्ती, संशोधनासाठी मार्गदर्शन यासंबंधी माहितीचे आदानप्रदान करण्यात येईल.
यासंदर्भात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डी. एम. कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, भ्रातृमंडळ पुणे तर्फे पुरुषोत्तम पिंपळे, श्रीकृष्णा खडसे तसेच क्विन्स युनिव्हर्सिटी तर्फे डॉ. ऐश्वर्या पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, डॉ. प्रशांत वारके (संचालक, जीआयएमआर), कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अशोक चौधरी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असलेले इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक वर्ग यांची उपस्थिती होती.