• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ; शुभेच्छांचा पडला पाऊस

लाडूतुला, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, अन्न-फळ वाटपाने वाढदिवस साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 8, 2022
in जळगाव जिल्हा
0
आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ; शुभेच्छांचा पडला पाऊस

गजानन पाटील | अमळनेर, दि. ०८ – अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवस यंदा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. दिवसभरात सर्वपक्षीय मान्यवर, सर्व स्तरातील नागरिक, हितचिंतक, कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडला. दिवसभरात कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही पार पडले.

यंदाच्या वाढदिवसाला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीने सायंकाळी आमदारांची लाडूतुला करून सदरचे लाडू सर्वांना वाटण्यात आले. सकाळपासूनच आमदारांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली असल्याने या परिसराला दिवसभर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते, रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देणार यांचा ओघ सुरू होता, वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी सामाजिक व लोक हिताचे उपक्रम आयोजित केले होते यात सकाळी आरोग्य शिबिरात अनेकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या.
दरम्यान अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराचे आयोजन गौतम पाटील, वरूण पाटील, धीरज पाटील, तेजस पाटील, सौरव पाटील, किरण माळी, राहुल गोत्राळ व आमदार अनिल भाईदास पाटील मित्र परिवाराने केले होते. त्यानंतर वेले ता.चोपडा येथील बेवारस मनोरुग्ण कल्याण आश्रमात अन्नदान कार्यक्रम पार पडला. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. याशिवाय विविध ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले.

तसेच दिवसभरात विविध ठिकाणी आमदारांना आमंत्रित करून वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार, केक देखील कापण्यात आले. आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेते मंडळी तसेच जिल्हाभरातील नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकारी आदींनी भ्रमणध्वनी द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. तर जिल्हाभरातील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अमळनेरात येऊन आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आमदारांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक व कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या शुभेच्छांचे फलक संपूर्ण शहरात झळकत होते. विशेष करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसभर आमदारांच्या निवासस्थानी दिसून आल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असले तरी महाविकास आघाडीची एकजूट घट्ट असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.


 

Next Post
जामनेर नगरपरिषदतर्फे देण्यात येणारा दिव्यांग निधि ८ टक्के ऐवजी ५ टक्केच वाटप

जामनेर नगरपरिषदतर्फे देण्यात येणारा दिव्यांग निधि ८ टक्के ऐवजी ५ टक्केच वाटप

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add