भडगाव, दि. २० – तालुक्यातील कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण विद्यालयाचा १० वी चा निकाल ८८.०९% टक्के लागला असून विद्यालयातुन प्रणव अनिल पवार याने ८७.४० टक्के गुण मिळवुण प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर दुसरा क्रमांक प्रणव प्रवीण परदेशी याने ८६.२० टक्के, तिसरा क्रमांक खुशी सुनील पाटील ८६ टक्के, चौथा क्रमांक भावेश सोमनाथ महाजन ८५.८० टक्के, पाचवा क्रमांक गायत्री कोमलसिंग पाटील ८४.६० टक्के गुण मिळवले आहे.
परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन मंगेश पाटील, व्हाईस चेअरमन दिनकरराव पाटील, सचिव रत्नाताई पाटील, सहसचिव पंजाबराव देवकर व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एम. के. पवार, पर्यवेक्षक जी. टी. पाटील यांच्या सह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच गावातुनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.