• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

अशोक जैन यांनी व्यक्त केला शोक; शेती, माती आणि शेतकऱ्यांशी नानांचे होते जिव्हाळ्याचे नाते

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन, सामाजिक
0
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

जळगाव, प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संवेदनशील कलाकारासोबतच माती, शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत राहतील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261009-WA0000.mp4

 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन हिल्स आणि नाना पाटेकर यांच्यातील स्नेहाच्या आठवणींना उजाळा देताना अशोक जैन यांनी सांगितले की, नाना यांनी २००५ आणि २०१५ मध्ये जैन हिल्सला सदिच्छा भेट दिली होती. विशेषतः १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जैन हिल्स येथे आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर आणि श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांची भेट झाली होती.

या भेटीत शेती, माती आणि पाणी या विषयांवर दोघांमध्ये मनमोकळा आणि सविस्तर संवाद झाला. हा केवळ दोन मान्यवरांमधील औपचारिक संवाद नव्हता, तर मातीवर प्रेम करणाऱ्या दोन संवेदनशील व्यक्तींमधील आत्मीय संवाद होता. शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांबद्दल नाना पाटेकर यांना असलेली आस्था या भेटीत प्रकर्षाने जाणवत होती.

जैन हिल्समधील शेती संशोधन केंद्रालाही नाना यांनी उत्सुकतेने भेट दिली. तेथील विविध शेती प्रयोगांची त्यांनी आस्थेने माहिती घेतली. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या आंब्याच्या रोपांमध्ये त्यांना विशेष रस होता. आपल्या फार्म हाऊससाठी त्यांनी श्रद्धेय मोठेभाऊंकडे आंब्याची रोपे मागितली होती. त्यानंतर आंबा, पेरू, सीताफळ आणि नारळाची रोपे त्यांच्या फार्म हाऊसवर पाठविण्यात आली.

या रोपांशी नाना पाटेकर यांचे केवळ औपचारिक नाते राहिले नाही, तर त्यांनी ती रोपे मोठ्या प्रेमाने जोपासली. शेती, माती आणि वृक्षांशी त्यांचे असलेले नाते त्यांच्या या कृतीतूनही दिसून येत होते.

श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन, जैन परिवार आणि नाना पाटेकर यांच्यातील स्नेहाचा धागा शेती, माती, पाणी आणि माणुसकीने जोडलेला होता. नाना पाटेकर यांच्या निधनाने हा स्नेहाचा धागा कायमचा तुटला असला, तरी त्यांनी जपलेली मातीशी नाळ आणि जैन हिल्सशी जोडलेल्या त्यांच्या आठवणी तेथील मातीत सदैव जिवंत राहतील, अशी भावना अशोक जैन यांनी व्यक्त केली.

नाना पाटेकर यांच्या स्मृतींना अशोक जैन यांनी विनम्र अभिवादन केले.


 

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add