• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी : काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या दिनेश ज्ञानेश्वर पाटील (वय २७, रा. धानोरा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी धानोरा येथे घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिनेश पाटील हा मूळचा धानोरा येथील रहिवासी असून, तो सुरत येथे कामाला होता. काकांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी तो गावी आला होता. शनिवारी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. काही वेळाने त्याचा भाऊ त्याला बोलवण्यासाठी गेला असता दिनेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. दिनेशने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Next Post
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या
गुन्हे

काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित
गुन्हे

डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

October 4, 2026
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हे

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

October 4, 2026
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 4, 2026
तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add