• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नशामुक्तीची शपथ ग्रहण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

जळगाव : सध्याची परीस्थिती अत्यंत भयावह आहे. गतवर्षी पोलिसांनी ६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले. यंदा ४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. १७ ते ३० या वयोगटातील तरूण व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनांचे हे वळण सिन्थेटीक पध्दतीकडे वळाले असून पोलीस विभागाने संकल्प केलेल्या मिशन राइज एक्सचे यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा पोलीस दल आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन राइज एक्स या कार्यक्रमाचे सोमवारी (१६ ऑगस्ट) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक केदार बारबले, प्रशिक्षणार्थी डिवायएसपी श्री. दरेकर, एलसीबीचे पोनि राहुल गायकवाड, पोनि राहुल वाघ, एपीआय योगिता नारखेडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयालयाचे विभाग प्रमुख डॉ. वैभव पाटील, युवाशक्तीचे अध्यक्ष विराज कावडीया, ज्यु. मकरंद अनासपुरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मिशन राइज या लोगोचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील उत्कर्ष भोसले, प्राची मुरळे, कौस्तुभ वडगावकर, ओम चौधरी, पायल यांची मिशन राइजसाठी निवड करण्यात आली.

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी व्यसनांची विविध कारणे, त्यामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम आणि उपाययोजना याविषयी चलचित्रफितीद्वारे सादरीकरण केले. यासोबतच व्यसनांना नकार देण्याची हिंमत ठेवा असे आवाहनही डॉ. हुमेद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थ सेवन करणार्‍यांविरोधात कायद्यात नेमक्या कुठल्या प्रकारच्या शिक्षा आहेत याविषयी चलचित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह मान्यवरांना नशामुक्तीची शपथही दिली.

व्यसनांना नाही म्हणणे हाच योग्य मार्ग असल्याचे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हे समाजासाठी रोल मॉडेल आहेत. त्यामुळे रोल मॉडेल असलेल्या विद्यार्थ्यांनी नशामुक्तीच्या या अभियाना सक्रीय सहभागी व्हावे. गोदावरी हेल्थ सिटीचा परिसर हा नशामुक्त असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात ज्यु. मकरंद अनासपुरे यांनी विविध राजकारणी, अभिनेते यांच्या मिमीक्रीच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले. तर आभार डिवायएसपी केदार बारबले यांनी मानले.  या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. हर्षल बोरोले, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 18, 2026
ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
खान्देश

ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

August 18, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 18, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
सामाजिक

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
शहीद जवानांच्या परिवारांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आरोग्य

शहीद जवानांच्या परिवारांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

August 17, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add