• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

नासाकडून सायबर सुरक्षा संशोधनासाठी यतीश भारंबेचा गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2026
in शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी यतीश भारंबे याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या जोरावर जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नासाकडून अधिकृत गौरव मिळवून महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.

नासाच्या असुरक्षीतता प्रकटीकरण अंतर्गत त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत अधिकृत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे. यतीश यांनी नासाच्या माहिती सुरक्षा प्रणालीतील संभाव्य सुरक्षात्रुटी शोधून ती जबाबदारीने संस्थेकडे नोंदविली. त्यांच्या या संशोधनामुळे नासाच्या माहिती प्रणालीची सुरक्षितता अधिक बळकट करण्यास मदत झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. नासाचे एसआयएसओ वरिष्ठ एजन्सी माहिती सुरक्षा अधिकारी माईक विट यांनी पाठविलेल्या प्रशंसापत्रात यतीश यांच्या स्वतंत्र सुरक्षा संशोधक म्हणून केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यतीश यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे यश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संशोधन, नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील.

या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील व विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी यतीश यांचे अभिनंदन केले. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.


 

Next Post
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add