• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे दि. २२ व २३ जून २०२६ रोजी अंतिम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग आणि जी.एन.एम. विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या प्रक्रियेसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या भरती पथकात दीपा देशपांडे (मॅनेजर – एचआर), कुंजन कुलकर्णी (नर्सिंग सुपरवायझर) आणि माधवी चकोले (फ्लोअर मॅनेजर) यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत संस्थेची कार्यपद्धती, करिअरमधील प्रगतीच्या संधी, व्यावसायिक कौशल्यांचा विकास तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील अपेक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.निवड प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची पडताळणी, अभिक्षमता चाचणी, तांत्रिक मूल्यमापन आणि वैयक्तिक मुलाखतींचा समावेश करण्यात आला होता.

ही कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठित आरोग्यसेवा संस्थेत रोजगाराच्या संधी मिळवून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व संधी मिळतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी आणि प्राध्यापकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूरच्या भरती पथकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नामांकित आरोग्यसेवा संस्थेत करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या.

Next Post
१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add