• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 22, 2026
in आरोग्य
0
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोदावरी हेल्थ सिटी येथे योगाभ्यास शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या शिबिरात योगगुरू चैतन्य क्षीरसागर तसेच योग शिक्षिका डॉ. कोमल पाटील यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांकडून सराव करून घेतला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी योगामुळे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक संतुलन, कार्यक्षमता आणि जीवनशैलीत होणार्‍या सकारात्मक बदलांविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यास हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय सेवांशी संबंधित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. योगाभ्यास शिबिरामुळे उपस्थितांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, नियमित योग करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add