• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

स्वर सुमनांजलीतून उलगडणार आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांचा संगीत प्रवास

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2026
in मनोरंजन, शैक्षणिक
0
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी संगीत महाविद्यालय यांच्या वतीने शनिवार, २० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात मृगोत्सव २०२६ अंतर्गत स्व.आशा भोसले आणि स्व. सुमन कल्याणपूर यांच्या संगीत प्रवास आशा – सुमन स्वर सुमनांजलीतून उलगडणार आहे.

या कार्यक्रमात भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील दोन महान गायिकांच्या सुरेल गीतांचा आस्वाद या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांमधून आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा प्रवास उलगडला जाणार असून संगीतप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजी) आणि डॉ. केतकी पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जळगावातील संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. पद्मजा नेवे यांनी केले आहे. संगीत, गायन आणि नृत्य यांच्या संगमातून साकार होणारा हा ‘आशा – सुमन स्वर सुमनांजली’ कार्यक्रम मृगोत्सव २०२६ जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक संस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.


 

Tags: #musicGodavariJalgaon
Next Post
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add