• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 16, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

जळगाव, (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला व्यावसायिक अनुभवाची जोड देणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटर्नशिप. याच पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅमचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या अंतिम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने ८४.५० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा व वैद्यकीय कार्यपद्धतीचे ज्ञान मिळावे यासाठी एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करावी लागते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे, पीडियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, इंटर्नशिप प्रोग्रॅमचे समन्वयक डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. बडगुजर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांनी शिस्त, सेवा वृत्ती आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता जपण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्ये, रुग्णसेवेचे महत्त्व आणि व्यावसायिक जबाबदार्‍या याविषयी मार्गदर्शन केले. या ओरिएंटेशन प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना आगामी इंटर्नशिप कालावधीतील जबाबदार्‍या, विविध विभागांतील कार्यपद्धती तसेच रुग्णसेवेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण याबाबत सविस्तर माहिती मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Next Post
विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add