• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांचा निर्धार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 15, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांचा निर्धार

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीसंदर्भातील विविध बाबींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पुर्वचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद, राज्यातील विकासकामे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती देण्यात आली. मतदान करताना घ्यावयाची काळजी, मत वैध राहण्यासाठी आवश्यक बाबी तसेच निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्याबाबत माहिती जाणून घेतली.

महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकजूट, पक्षशिस्त आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जात असून नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांनी केले.

बैठकीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून महायुतीच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.


 

Next Post
आरोग्य संवर्धनासाठी ‘जलनेती’चे महत्त्व; अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे प्रात्यक्षिक

आरोग्य संवर्धनासाठी 'जलनेती'चे महत्त्व; अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्या

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add