• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘TWY’ कंपनीचा जळगाव शाखा प्रमुख जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘TWY’ कंपनीचा जळगाव शाखा प्रमुख जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या TWY असोसिएट्स प्रा.लि. कंपनीचा जळगाव शाखा प्रमुख मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१, रा. शिवकॉलनी, जळगाव) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

​मिलींद पाटील याने पुणे येथील मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर व संकेश रामकृष्ण घाग यांच्याशी संगनमत करून जळगाव शहरात डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत कंपनीची फ्रँचायसी चालवली. गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेनिंगची खोटी माहिती देऊन आणि जास्तीत जास्त परताव्याचे आमिष दाखवून २७९ गुंतवणूकदारांकडून २३,८१,७२,५३०/- रुपये जमा केले. मात्र, मुदत संपल्यानंतरही परतावा न देता या रकमेचा अपहार केला.

​भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांच्या फिर्यादीवरून मिलिंद पाटील व इतर संचालकांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गु.र. नं. १६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.


​या कंपनीच्या संचालकांवर केवळ जळगावातच नव्हे, तर यवतमाळ, चिपळूण, खारघर, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजी नगर यांसारख्या शहरांतही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांना यापूर्वीच ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

​जळगाव शाखेत ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवून आपली फसवणूक झाली आहे, त्यांनी अधिक माहितीसाठी आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य’; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका दिन साजरा

‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य’; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका दिन साजरा

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add