• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंडळ अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 12, 2026
in गुन्हे
0
मंडळ अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

​जळगाव, (प्रतिनिधी) : शेतातील अवैध खोदकामाची तक्रार चौकशी बंद करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना नशिराबाद भागाचे मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे (वय ३७) आणि एक खाजगी इसम सुरेंद्र प्रल्हाद अहिरे (वय ३९) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, १२ मे रोजी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयासमोर करण्यात आली.

​तक्रारदाराच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी शेतात अवैध खोदकाम केल्याबाबत तहसील कार्यालयात तक्रार केली होती, जी नंतर मागे घेण्यात आली होती. मात्र, या अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम खासगी इसम सुरेंद्र अहिरे याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते.

तक्रारदाराने याप्रकरणी नाशिक ‘एसीबी’कडे धाव घेतली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या पथकाने पिंप्राळा तलाठी कार्यालयाबाहेर सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक, हेमंत नागरे व पथकाने यशस्वी केली.
​

Tags: #curptionCrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव @ ४५.५ अंश: आगामी आठवडाभर उष्णतेची लाट कायम

जळगाव @ ४५.५ अंश: आगामी आठवडाभर उष्णतेची लाट कायम

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add