• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नशिराबाद महामार्गावर महावितरणचा अडथळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे सत्र, प्रशासनाचे दुर्लक्ष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
नशिराबाद महामार्गावर महावितरणचा अडथळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे सत्र, प्रशासनाचे दुर्लक्ष

​जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ-जळगाव महामार्गावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ असलेला महावितरणचा विद्युत खांब आणि सबस्टेशनची भिंत यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नुकतीच एका ट्रकने येथील खांबाला धडक दिल्याने तब्बल ८ दिवस दुरुस्तीचे काम सुरू होते. या काळात परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, एमआरआय आणि सिटीस्कॅन यांसारख्या अत्यावश्यक सेवांना जनरेटरचा आधार घ्यावा लागला. मात्र, या समस्येचे मूळ कारण महावितरण आणि रस्ते महामंडळ यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.

​विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल..
येथे सर्विस रोड अत्यंत अरुंद असल्याने एसटी बसेस आणि अवजड वाहने वळताना मोठी अडचण येते. अधिकृत बस थांबा असूनही, रस्ता अरुंद असल्यामुळे बसेस थांबत नाहीत. परिणामी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थ्यांना अर्धा ते एक किलोमीटर पायपीट करावी लागते.

​प्रशासकीय अनास्था..
महामार्ग पूर्ण होऊन बराच काळ लोटला असला, तरी सबस्टेशनच्या जागेचा पेच सुटलेला नाही. महावितरणने आपली जागा रस्ते महामंडळाला हस्तांतरित केल्याशिवाय रस्ता रुंद होणे शक्य नाही. याच पट्ट्यात दोन ते तीन विद्युत खांब थेट रस्त्यात येत असल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे.

​”अनेकदा तक्रारी आणि निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म आहे. भविष्यात एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच यंत्रणांना जाग येईल का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि महाविद्यालय प्रशासनाकडून विचारला जात आहे. ​संबधित विभागाने तातडीने समन्वय साधून ही जागा ताब्यात घ्यावी आणि रस्ता रुंद करावा, अशी मागणी होत आहे.

Next Post
कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add