• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

​जळगाव, (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक बंगल्यावरील सुरक्षा कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शस्त्रास्त्रांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जळगाव पोलीस दलातील दोन अंमलदारांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही धडक कारवाई केली असून, यामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी रात्री ९:२० वाजेच्या सुमारास राखीव पोलीस निरीक्षकांनी अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. यावेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार संभाजी निबाजी पाटील आणि पोलीस नाईक प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही विनापरवानगी आपल्या कर्तव्यस्थळावरून गैरहजर असल्याचे आढळले.

​तपासणीदरम्यान केवळ गैरहजेरीच नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब समोर आली. गार्ड रूममध्ये असलेली एस.एल.आर. रायफल कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेता बेवारस अवस्थेत ठेवलेली आढळली. अतिसंवेदनशील परिसरात शस्त्रास्त्रांबाबतचा असा हलगर्जीपणा सुरक्षेसाठी घातक मानला जात आहे.

​शासकीय शस्त्रांची निगा न राखणे आणि कर्तव्यात कसूर करणे हा महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षक धिवरे यांनी दोघांनाही तत्काळ निलंबित केले असून, त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात येणार आहे. निलंबन काळात त्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा कडक इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

ताज्या बातम्या

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
जळगाव जिल्हा

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

June 9, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group