• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 22, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याला सिंचन विहिरीचे पुढील अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) निष्पन्न केले असून, त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मूळ तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून, त्यांना सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मागासवर्गीय घटक) पंचायत समिती, जामनेर यांच्याकडून सिंचन विहीर मंजूर झाली होती. या प्रस्तावित विहिरीची स्थळपाहणी करण्यापूर्वी संशयित लोकसेवक सागर नावकर याने तक्रारदाराकडून गावातील रोजगार सेवकामार्फत ३० हजार रुपये स्वीकारून स्थळपाहणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराला वेळोवेळी ६०,९६६/- रुपयांचे अनुदान मिळाले.

​विहिरीचे उर्वरित अनुदान मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी सागर नावकर याची भेट घेतली असता, त्याने “तुम्ही विहिरीचे ठिकाण बदलले आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर पुढील अनुदान पाहिजे असेल तर ३० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.

​या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणी कारवाईदरम्यान संशयित लोकसेवक सागर नावकर याने शासन योजनेअंतर्गत मंजूर सिंचन विहिरीचे काम करण्यासाठी पुढील अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यावरून आज २२ जून २०२६ रोजी त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​ही कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (पर्यवेक्षण व तपास अधिकारी), सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे (ला.प्र.वि. नंदुरबार, कॅम्प-जळगाव) आणि सापळा पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, राकेश दुसाने, प्रदिप पोळ, व भूषण पाटील यांच्या पथकाने केली आहे.


 

Tags: #curptionJalgaonJamnerPolice
Next Post
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add