• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात ‘शिवराय स्वारी आग्रा’चा थरार

पोनि राजेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते तिसऱ्या दिवसाचे उद्घाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात ‘शिवराय स्वारी आग्रा’चा थरार

जळगाव, (प्रतिनिधी) : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते संस्कारांचे एक प्रभावी माध्यम आहे. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख होते, असे प्रतिपादन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे उद्घाटन गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

​महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी आग्र्याच्या कैदेतून केलेली सुटका हा रोमहर्षक इतिहास पडद्यावर अनुभवताना उपस्थित शेकडो विद्यार्थी भारावून गेले होते. “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. केवळ मनोरंजनच नव्हे, तर नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास समजावा या उद्देशाने आयोजकांनी या चित्रपटाची निवड केली होती.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. संजय हांडे, सचिन महाजन आणि डॉ. वीणा महाजन यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक गुंजाळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विनीत जोशी, डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. सुचित्रा लोंढे, किरण सोहळे, रत्नाकर पाटील, योगेश शुक्ल, विनोद ढगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शैलेश शिरसाठ यांनी आणि आभार प्रदर्शन श्वेता जैन यांनी केले.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधना, पालकशाळा आणि बालरंगभूमी परिषदेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


 

Next Post
JCL T20 : जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

JCL T20 : जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add