• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

​आरोग्य, सुरक्षा आणि व्यसनमुक्तीचा त्रिवेणी संगम; जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा होणार ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने गौरव

​जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित ‘अग्निशिखा महिला ग्रुप’ तर्फे जळगाव शहरात महिलांसाठी एका विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ मार्च रोजी जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

​तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रबोधन..
महिलांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर या कार्यक्रमात प्रकाश टाकला जाणार आहे. यात प्रामुख्याने ​महिलांच्या आरोग्याशी संबंधित मासिक पाळी व इतर समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून दिले जाईल.

​समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि समाजकार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नर्सेस आणि डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.

​‘खान्देश रत्न’ पुरस्काराची घोषणा..
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात डॉ. निलेश चांडक, डॉ. सीमा पाटील, डॉ. पूजा सोमानी, डॉ. प्राची महाजन, डॉ. नितीन विसपुते, डॉ. अविनाश खेलवाडे, प्रा. वासुदेव पाटील, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. शीतल पाटील, जागृती येवले, तृप्ती कांकरिया, युगंधरा सोळुंके, डॉ. अवधूत चौधरी आणि डॉ. रुकसाना खान यांचा समावेश आहे.

​जळगाव जिल्ह्यात प्रथमच महिलांसाठी असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित केला जात असून, जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्निशिखा महिला ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!

इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add