• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

कालंका माता चौकातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील कालंका माता चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने पायी जाणाऱ्या हातमजुराला चिरडल्याची भीषण घटना घडली. प्रभाकर पाटील (वय ५५, रा. तेली चौक) असे मृताचे नाव असून, या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरची तोडफोड करत महामार्गावर रास्तारोको केला.

​प्रभाकर पाटील हे रात्री काम आटोपून भाजीपाला घेऊन पायी घराकडे परतत होते. कालंका माता चौफुलीजवळ डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

​जमावाचा उद्रेक आणि पोलीस कारवाई..
​अपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करून काचा फोडल्या आणि रस्ता रोखून धरला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. एमआयडीसी आणि शनिपेठ पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याच ठिकाणी वर्षभरापूर्वी एका मुलीचाही बळी गेला होता. बायपास सुरू होऊनही शहरांतर्गत महामार्गावर अवजड वाहनांमुळे होणारे अपघात थांबत नसल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Tags: #jalgaon_cityaccident
Next Post
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add