• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

जळगाव मनपासह आचारसंहिता लागू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 15, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

​मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई-ठाण्यासह राज्यातील गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार, १५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यात जळगाव महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे.

​ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका गेल्या ५ ते ७ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
​
तीन कोटींहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क..
​या महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरातून सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपलेली असून, त्यासोबतच जालना आणि इचलकरंजी या दोन नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांच्याही निवडणुका होणार आहेत. महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून, राजकीय हालचालींना जोर येण्याची शक्यता आहे.

​निवडणूक कार्यक्रम..
​इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत सादर करता येतील. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी असून, त्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

Tags: #elections#municipalcorporation#politicalJalgaon
Next Post
जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add