• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रूढी बाजूला सारून आदर्श: वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्धदिनी स्वयंस्फूर्त रक्तदान!

मुक्ती फाउंडेशनतर्फे समाजोपयोगी उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 10, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रूढी बाजूला सारून आदर्श: वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्धदिनी स्वयंस्फूर्त रक्तदान!

​जळगाव, (प्रतिनिधी) : समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या उदात्त भावनेतून जळगाव शहरातील दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी त्यांचे वडील कै. देवपुरी रामपुरी (डी.आर. नाना) गोसावी यांच्या प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम पारंपारिक रूढी बाजूला ठेवून एका समाजपयोगी उत्सवात रूपांतरित केला. मुकुंद गोसावी आणि त्यांच्या पत्नी मुक्ता गोसावी यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला, मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान, आणि अवयवदान, देहदान जनजागृती असे विविध उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.

​​मुकुंद गोसावी यांनी वडिलांच्या निधनानंतरही (डिसेंबर २०२४) पहिल्या ते तेराव्या दिवसांपर्यंत दुखवटा न पाळता रामद्वारा सत्संग, वृक्षारोपण, रक्तदान, अवयवदान/देहदान, मतदान जागृतीसारखी सामाजिक कार्ये केली होती. तेराव्या दिवशी फक्त एक एक वृक्ष लावून रक्तदानाचे आवाहन केले होते, ज्याला नातेवाईक आणि परिचितांनी स्वेच्छेने प्रतिसाद दिला होता.
​

प्रथम वर्षश्राद्धात आरोग्य शिबिर व रक्तदान..
​वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त ९ डिसेंबर, तसेच संघ शताब्दी वर्ष आणि ‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने श्रीराम नगर (दादावाडी परिसर) येथे विश्व शांती प्रार्थना, वृक्षारोपण आणि विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या रक्तपुरवठा कमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले.

या शिबिरात मुक्ता आणि मुकुंद गोसावी यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करत उपक्रमाची सुरुवात केली. एकूण ४१ जणांनी रक्तदान करून सहयोग दिला. तसेच मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन शिबिराचा २६९ जणांनी लाभ घेतला. यामध्ये हृदय रोग, रक्तदाब, मधुमेह, जनरल तपासणी आदी करण्यात आल्या.

​या शिबिरासाठी दशनाम गोसावी समाजातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शि.रा.गोसावी, विजया गोसावी, कैलासपूरी गोसावी, अनिलकुमार गोसावी, संध्या गोसावी, किशोरपूरी गोसावी, शाम गोसावी, अक्षय गोसावी, भाग्यश्री गोसावी, अर्चना रवींद्र गिरी, योगेश गोसावी, किरण गोसावी, आशीष गोसावी, सागर गोसावी, डॉ. अजय देशमुख, गोपाल वालेचा, स्वप्नील पालवे, गोपाल चौधरी, सतीश महाजन, हर्षद भारती, परिमल गिरी, अनिल गिरी आदींनी मोलाचे सहकार्य केले.
​

Next Post
बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे खिसे कापणारे तिघे अटकेत! ₹१५,००० रोख हस्तगत

बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे खिसे कापणारे तिघे अटकेत! ₹१५,००० रोख हस्तगत

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add