• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात कुंटणखान्यावर धाड: बांगलादेशी तरुणीची सुटका, मुख्य सूत्रधार महिलेला अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 24, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात कुंटणखान्यावर धाड: बांगलादेशी तरुणीची सुटका, मुख्य सूत्रधार महिलेला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वी कारवाई केली. या कारवाईत एका २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या पूजा आत्माराम जाधव (वय २७, रा. प्रोफेसर कॉलनी, जळगाव) या महिलेला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन प्रोफेसर कॉलनी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटणखान्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला चौकशीचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकांनी प्रोफेसर कॉलनी येथील संशयित घरावर धाड टाकली. पोलिसांनी स्वतःची ओळख दिल्यावर पूजा जाधव या महिलेने दरवाजा उघडला.

घराची झडती घेतली असता, तेथे एक २५ वर्षीय बांगलादेशी तरुणी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी बांगलादेशी तरुणीने धक्कादायक जबाब दिला. तिने सांगितले की, २३ जुलै रोजी ती नाशिक रेल्वे स्टेशन येथे असताना संशयित पूजा जाधव हिने “तुला जळगावात नोकरी लावून देते” असे आमिष दाखवून तिला जळगावला आणले. मात्र, येथे आल्यावर तिच्यावर बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडले जात होते.

घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक तो मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी सावकारे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, नितीन बाविस्कर यांच्यासह जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल भारती देशमुख आदींच्या पथकाने पार पाडली.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी

गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

April 19, 2026
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!
जळगाव जिल्हा

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

April 19, 2026
रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत
गुन्हे

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

April 18, 2026
सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group