• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

जळगाव एलसीबी आणि अकोला पोलिसांची संयुक्त कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 17, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे आणि अकोला पोलिसांच्या मदतीने, दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा कट उधळण्यात आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याचे चार साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सोबत सपोनि अनिल जगन्नाथ जाधव, वाहन चालक पोहेकॉ दर्शन हरी ढाकणे दि. १५ रोजी रात्री ११ वाजता जिल्हा गस्तीवर होते. मुक्ताईनगर उपविभागात गस्त घालत असताना, अंतुली ते डोलारखेडा रस्त्यावर कुंड गावात एका इनोव्हा कारमधून चार जण उतरून दरोडा टाकण्याच्या तयारीत एका घराकडे जाताना दिसले. पोलिसांचे वाहन दिसताच, आरोपी पुन्हा इनोव्हा कारमध्ये बसून डोलारखेडा फाट्यामार्गे नागपूर महामार्गावरून भरधाव वेगाने पळून जाऊ लागले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ चालक ढाकणे यांना वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले. पाठलाग करत असताना पोलिसांनी आरोपींना वारंवार थांबण्याचा इशारा दिला, परंतु इनोव्हा कार थांबली नाही. शासकीय वाहनाने इनोव्हा कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, इनोव्हा कार चालकाने शासकीय वाहनाला कट मारून पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

यामुळे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, अकोला येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सदर वाहन थांबविण्याबाबत कळवले आणि स्वतः पाठलाग सुरू ठेवला. दि.१६ रोजी पहाटे ०३:४० च्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात, अकोला शहरातील डिव्हिजन गस्तीचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाजवळ, नागपूर-धुळे महामार्गावर ट्रक आडवे लावून नाकाबंदी केली. नाकाबंदीमुळे आरोपींची इनोव्हा कार हळू झाली आणि बंद पडली. पोलिस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतच्या अंमलदारांनी तात्काळ आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, इनोव्हा कारमध्ये मागे बसलेले ३ आरोपी आणि ड्रायव्हर सीटजवळ बसलेला १ इसम दरवाजा उघडून पळून गेले. जुने शहर पोलीस स्टेशनचे पोउपनि रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे आणि पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या झटापटीत इनोव्हा कार चालकाने स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या अंगावर गाडी आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ मुका मार लागला आहे.

पोलिसांनी तात्काळ इनोव्हा कार चालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. खदान, हैदरपुरा, आलिम चौक, अकोला) याला ताब्यात घेतले. इनोव्हा कार क्रमांक (एमएच ३० सीआर ४७२८) ची झडती घेतली असता, त्यामध्ये एक काळ्या रंगाचा चोरी केलेला बैल, एक तलवार, एक गुप्तो (धारदार शस्त्र), एक चाकू, एक लोखंडी रॉड, दोन दोर आणि काही कपडे असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आणि हत्यारे मिळून आले. हे सर्व साहित्य जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथे पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील अटक आरोपी अरबाज खान फिरोज खान याच्यासह फरारी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. सैय्यद फिरोज उर्फ अनडूल सैय्यद झहीर (रा. अजमपुरा, कसारखेडा, ता. बाळापूर, जि. अकोला), अफजल (पूर्ण नाव माहित नाही, रा. काली घाणीपुरा, बाळापूर, जि. अकोला), इम्रान (पूर्ण नाव माहित नाही, रा. विकुंड नदी, कसारखेडा, बाळापूर, जि. अकोला), तन्नू उर्फ तनवीर (पूर्ण नाव माहित नाही, रा. काली घाणी, बाळापूर, जि. अकोला), अफरोज खान उर्फ अप्प्या (रा. कुबा मशीद, अकोट फाईल, अकोला) या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक..
संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील, सपोनि शरद बागल, सपोनि अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे, सफीर रवी नरवाडे, पोहेकॉ सुनील दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोहेकॉ भरत पाटील आणि जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथील पोउपनि रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे, पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 


Tags: Crime
Next Post
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group