• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाणंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाची मोहीम

जामनेर तालुक्यात हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव पाणंद रस्ता मोकळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाणंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाची मोहीम

जामनेर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील सर्व शिव पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असून त्या योजनेचा शुभारंभ मंगळवारी जामनेर तालुक्यात करण्यात आला आहे. मौजे हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु असा शिव पाणंद रस्ता उपविभागीय अधिकारी विनय गोसावी व तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तोंडापूर व ग्राम महसूल अधिकारी, तोंडापूर यांनी मोकळा केला आहे.

संबंधित गावचे ग्राम विकास अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील तसेच शेतकरी ग्रामस्थ यांचे मदतीने सदरचा शिव पाणंद रस्ता अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येऊन सदरचा रस्ता शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आलेला आहे. सदर रस्त्याचे एकूण अंतर हे अंदाजे २ किमी इतके असून अतिक्रमीत अंतर अर्धा किलोमीटर इतके आहे. सदर शिव रस्त्याचे अतिक्रमण काढल्याने या भागातील किमान १४० शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे. सदरच्या मोहिमेतून सर्व शिव पाणंद रस्त्याच्या हद्दी निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते तयार करण्यासाठी रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाचे योजनेतून कामकाज करण्यात येणार आहे.

सदर खुले करण्यात आलेल्या शेतरस्त्यांची नोंदी गावचे नकाशावर करणेबाबत शासन स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे. तसेच शेतजमिनीच्या वाटप आदेशाचे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ चे आदेशात देखील शेत रस्त्याचा उल्लेख करणे बाबत निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत. सदर शिवरस्ता खुला केल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवानी शासनाचे आभार मानले आहे. सदरची अतिक्रमण खुले करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी तोंडापूर विजयकुमार बागडे, ग्राम महसूल अधिकारी घुगे, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व शेतकरी बांधव यांचे मदतीने लोकसहभागातून करण्यात आलेली आहे.

Next Post
अहमदाबादच्या टेलरला मुक्ताईनगरातील जंगलात लुबाडले

अहमदाबादच्या टेलरला मुक्ताईनगरातील जंगलात लुबाडले

ताज्या बातम्या

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त
गुन्हे

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

July 29, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न
शैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 29, 2026
जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

July 28, 2026
न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 28, 2026
परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add