• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन हे आयुष्यात खूप महत्त्वाचे.. – ना. गुलाबराव पाटील

शहरात भव्य शोभायात्रेने गणेशवाडी परिसर झाला भक्तिमय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 13, 2025
in धार्मिक
0
भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन हे आयुष्यात खूप महत्त्वाचे.. – ना. गुलाबराव पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रीमद् भागवत कथा ही प्रेरणादायी ठरते. त्यासाठी भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन हे आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील गणेशवाडी परिसरात सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद भागवत कथेत रविवारी परिसरातून भव्य शोभायात्रा काढून या कथेची सांगता झाली. त्या वेळी ना.पाटील बोलत होते.

शोभायात्रेत महिला, पुरुषांसह लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या सातव्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी सुदामा चरित्र कथा सुश्राव्य केली. सुरुवातीला सुदामा यांच्या चरित्राविषयी हभप मोरदे महाराज यांनी भाविकांना माहीती दिली.

कथा झाल्यानंतर महाआरती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, देविदास धांडे, पवन पांडे, नंदराज चौधरी, अनिल चौधरी, सोनी शेठ, रवींद्र शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी परिसरात वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी हभप देवदत्त महाराज बग्गीत विराजमान होते. दिंडीत महिला डोक्यावर ग्रंथ, तुळसी आणि कळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

शोभायात्रा गणेश वाडी, जानकी नगर, कासम वाडी, मंजुषा कॉलनी या मार्गाने मार्गस्थ झाली. सोमवारी सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

मैत्रीत भेदभाव नसतो..
श्रीकृष्णा आणि सुदामा सारखी मैत्री जगात तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मैत्रीमध्ये गरीब – श्रीमंत, श्रेष्ठ – कनिष्ठ असा कधीही भेदभाव होत नाही. मुठभर पेराल तर गावभर मिळेल. तुम्ही देवाचे ध्यान करा, पूजा – अर्चा करा परमेश्वर तुम्हाला त्याचे फळ नक्की देईल. देवासाठी स्वतःला विसरून जावे लागले. श्रीमंत आणि गरीब असा भेट न करता निर्मळ अंतकर ओळखून परमेश्वर भेटतो, असेही हभप मोरदे महाराज यांनी यावेळी आपल्या मधुर वाणीतून सांगितले.


 

Next Post
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी.. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add