• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणांना मारहाण : दुचाकींची दगड टाकून तोडफोड

जळगाव शहरातील वाघनगरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 30, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज असून दोन दुचाकींची दगड टाकून तोडफोड करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहेत.

शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात चेतन सीताराम तायडे (वय-२६ रा.समता नगर) आणि अक्षय सुरेश लोखंडे (वय-२१ रा.समता नगर, जळगाव) हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय लोखंडे या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीडी.८६२४ व एमएच.१९.ईडी.८८७९ क्रमांकाच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाद पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी चेतन तायडे व अक्षय लोखंडे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान रुग्णालयात देखील अनेक तरुणांनी गर्दी केली होती.

Tags: Crime
Next Post
मंगेशदादांच्या प्रचारासाठी प्रतिभा वहिनी उतरल्या मैदानात

मंगेशदादांच्या प्रचारासाठी प्रतिभा वहिनी उतरल्या मैदानात

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add