• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अडावद येथील प्रौढाच्या खुनप्रकरणी चौघांना अटक

गांजा पिण्याचा जाब विचारल्याने खून केल्याची कबुली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
अडावद येथील प्रौढाच्या खुनप्रकरणी चौघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) : मुस्लिम कब्रस्थानजवळ चौघा संशयित तरुणांना ‘गांजा का पित आहेत ?’ याचा जाब विचारल्याने त्यांनी एका ४५ वर्षीय प्रौढाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून दोरीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक उलगडा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी दि. ७ सप्टेंबर रोजी केला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती डॉ. रेड्डी यांनी दिली.

अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास एक इसम मयत स्थितित पडलेला आहे. अशी माहिती अडावद गावाचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फोन करुन दिली होती. मयत इसम हा जगदिश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा. पाटचारी,अडावद ता. चोपडा) येथील असल्याची माहिती मिळाली. मयताच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाण झाल्याच्या व्रण दिसत होते. तसेच कशाचे तरी सहाय्याने गळा आवळल्याचे व्रण दिसत होते.

मयताचा मुलगा ईश्वर जगदिश सोलंकी (वय २० रा. पाटचारी, अडावद) याच्या फिर्यादवरुन अज्ञात आरोपीविरुध्द अडावद पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि वाघमारे व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा चौघा संशयित आरोपींची माहिती मिळाली. मयत जगदीश यांना शेवटचे कोणासोबत पाहिले, त्यांचे लोकेशन याबाबत अभ्यास केल्यावर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनतर घटनेचा उलगडा झाला. पाटचारी जवळील कब्रस्थान समोर बसुन गांजा पिणारे इरफान अब्दुल तडवी, शहारुख इस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजिद, कलिंदर रशिद तडवी (सर्वांचे वय २० ते २५, रा. अडावद) यांनी सदर मयतास ठार मारल्याची माहिती मिळाली.

मयत जगदीश सोलंकी यांनी मुस्लिम कब्रस्थानाजवळ गांजा पित असलेल्या चौघांना हटकले. “तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत” असे जगदीश सोलंकी बोलले. त्याचा संशयित आरोपी यांना राग आल्याने त्यांनी जगदीश सोलंकी याच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले. तेव्हा जगदीश हा पळु लागल्याने त्यास कब्रस्थान मधिल बांधकाम केलेल्या व्हरांडयात व रुममध्ये संशयित घेवुन गेले. तेथे लाठ्या काठयाने मारहाण केली. तसेच संशयित आरोपी कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळुन ठार मारले. प्रेत उचलुन हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर आणुन टाकले होते. अशी माहिती संशयीत आरोपींकडून पोलिसांना मिळाली.

संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि.१० सप्टेंबर रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ व अडावद पोलीस करित आहेत. अडावद पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा अत्यंत मेहनतीने केला असे सांगून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी तपास पथकाला बक्षीस देऊन गौरविले.


Tags: adavadCrimeJalgaon
Next Post
राज्यात गणेशोत्सवात जोरदार पाऊस होणार ; हवामान खात्याचा इशारा

राज्यात गणेशोत्सवात जोरदार पाऊस होणार ; हवामान खात्याचा इशारा

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group