• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 12, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेचा वापर केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

​सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी सावदा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर घडली. ​तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारण्यासाठी खडसे पोलीस ठाण्यात आले होते. खडसे यांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरच अधिकाऱ्यांना बोलावून मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. “तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत,” असे म्हणत त्यांनी पोलिसांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

​या प्रकरणात २९ जानेवारी २०२६ रोजीच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, तपास सुरू असल्याने खडसे यांनी मागितलेली कागदपत्रे देण्यास पोलिसांनी नकार दिला. यामुळे खडसे अधिकच संतप्त झाले.

​पोलिसांनी सहकार्य नाकारल्याने खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “आगामी अधिवेशनात तुम्हाला बघून घेतो” आणि “तुमच्यावर अँटी करप्शनचा (ACB) ट्रॅप लावतो,” अशी धमकी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित गुन्ह्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी एका मंत्र्यांविरोधात अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचाही आरोप आहे.

पहा काय म्हणाले आ. खडसे 

​या सर्व प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यांच्या तक्रारीवरून सावदा पोलिसांनी आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

Tags: #ekanathkhadse#savdaPolice
Next Post
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add