• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 12, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

​जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहूनगर, जळगाव) हा तरुण उस्मानिया पार्क, शिवाजीनगर भागात मोटारसायकलवर गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती.

​मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परिसरात रात्रीच्या वेळी सापळा रचला. संशयित मोहम्मद साद खान हा परिसरात दिसताच पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ०१ गावठी कट्टा आणि ०३ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह त्याची मोटारसायकलही जप्त केली आहे.

​याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस हवालदार सुनील पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील आणि रवींद्र कापडणे यांचा समावेश होता.
​

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य 'आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६' ​

ताज्या बातम्या

महावितरणचे आवाहन: गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘स्मार्ट’ सौरऊर्जा योजना
जळगाव जिल्हा

महावितरणचे आवाहन: गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘स्मार्ट’ सौरऊर्जा योजना

May 24, 2026
‘तो’ फोन ठरला संजीवनी! जळगावात मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी रुग्णाला आणले खेचून..
आरोग्य

‘तो’ फोन ठरला संजीवनी! जळगावात मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी रुग्णाला आणले खेचून..

May 23, 2026
आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द
जळगाव जिल्हा

आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द

May 23, 2026
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत

May 23, 2026
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी
आरोग्य

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

May 23, 2026
विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार
गुन्हे

विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार

May 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group