जळगाव, दि. 25 – स्वातंत्र्यपूर्व काळा पासून एका ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने ओळखला जाणारा जळगावातील पोलन पेठ हा परिसर आता ‘महात्मा ज्योतिबा फुले नगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. दरम्यान शुक्रवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नामांतर सोहळा पार पडला.
या परिसराच्या नामांतर प्रक्रियेसाठी केशव क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि खान्देश माळी महासंघाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करत, कोनशिलेचे अनावरण तसेच स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि याच दिवशी येथे या स्मारकाचे उद्घाटन झाले असून परिसराला त्यांचे नाव देण्यात आले असल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी आमदार लता सोनवणे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी महापौर सीमा भोळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक किशोर भोसले, ज्ञानेश्वर महाजन, खान्देश माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, प्रकाश महाजन, गुलाबराव वाघ, उमेश नेमाडे, मुकुंद सपकाळे, सचिन नारळे, सरिता माळी कोल्हे, शोभा चौधरी आदी मान्यवरांचं परिसरातील नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पहा.. व्हिडीओ
https://youtu.be/1AeV6UCshck