• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

​पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील बायपास रोडवर आज दुपारी एका भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोलला जोरदार धडक देऊन पलटी झाल्याची भीषण घटना घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

आज दि. १९ मार्च रोजी दुपारी ११:३० ते १२ च्या सुमारास भडगाव बाजूकडून पहूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक MH 19 CX 4699) पाचोरा बायपासवरून जात होता. यावेळी विकास कॉलनीकडून अचानक एक मोटारसायकलस्वार ट्रकसमोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकचा वेग जास्त असल्याने तो थेट दुभाजकावरील (डिव्हायडर) इलेक्ट्रिक पोलला धडकून विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला.

हा ट्रक ऑईलने भरलेला होता. अपघात होताच परिसरात मोठी खळबळ उडाली. ट्रक पलटी झाल्यावर चालक राजू पाटील हा आत अडकला होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी तत्परता दाखवत चालकाला सुखरूप बाहेर काढले. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


​बायपास रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ मोठी असते, मात्र अनेक चालक अतिवेगाने वाहने चालवतात. या अपघातानंतर “बायपासवर जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे,” असा सूर प्रत्यक्षदर्शी आणि बघ्यांनी व्यक्त केला.


 

Tags: #pachoraaccident
Next Post
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add