• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 20, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निमखेडी येथे गुरुवारी दुपारी एक थरारक उडवणारी घटना घडली असून, कौटुंबिक वादाचे पर्यावसान हत्येत झाले आहे. एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, तीन लहान मुले पोरकी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी परिसरात राहणारे नितीन सोनवणे (३५) आणि त्यांची पत्नी दीपाली सोनवणे (२८) हे दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी १९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरात कोणीही नसताना पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात नितीनने दीपालीच्या पोटावर विळ्याने आणि डोक्यावर इतर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे दीपाली आणि नितीन यांची दोन मुले आणि एक मुलगी अशा तीन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे, तर वडील तुरुंगात गेले आहेत. त्यांच्या पश्चात घरात आता केवळ ही तीन मुले आणि एक वृद्ध सासू असा परिवार उरला आहे. दरम्यान, हा कौटुंबिक वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! 'जेसीएल-२०२६' च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

ताज्या बातम्या

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!
राजकीय

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!

May 4, 2026
शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी
गुन्हे

शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

May 4, 2026
पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी
आरोग्य

पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

May 4, 2026
जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group