• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्यरत्नावली चौकात 2223 श्री गणेश मुर्तींचे व 3 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 20, 2021
in सामाजिक
0
व्यरत्नावली चौकात 2223 श्री गणेश मुर्तींचे व 3 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन

जळगाव, दि. 20 – भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाला आळा घालण्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी जळगावातील काव्यरत्नावली चौक येथे अनंत चतुर्दशी रविवारी गणेश मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी 2223 घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले. यासह 3 ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले. सकाळी 7.10 वाजता पहिली मुर्ती संकलीत करण्यात आली व सायंकाळी 9.55 मि. शेवटची मुर्ती संकलीत झाली. दिवसभरात 2223 कुटुंबांनी गणेश मुर्ती केंन्द्राला अर्पण करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील या ठिकाणी आपल्या घरगुती मुर्तीला अर्पण केले. केंद्राला महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, आयुक्त सतिश कुळकर्णी, पोलीस उपअधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी केंद्राला भेट दिली.

संकलित मुर्त्या विधिवतपणे सजविलेल्या दोन ट्रक व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मेहरूण तलाव येथे नेऊन विसर्जित करण्यात आल्या. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सदर उपक्रम सुरू होता. यशस्वितेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, अर्जुन भारूळे, सयाजी जाधव, वेदांत दुसाने, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, विनिता पाटील, दिनेश पाटील, वैष्णवी खैरनार, यश भालशंकर, अजय चव्हाण, तृषांत तिवारी, दिक्षांत जाधव, सागर सोनवणे, जयेश पवार, भुषण सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, अमोल सोनवणे, भटू अग्रवाल, गोपाल पांडे, योगेश वानखेडे, दर्शन भावसार, भवानी अग्रवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, सागर निकम, उमेश देशमुख, निरंजन पाटील, शिवम महाजन, राहूल ठाकूर, कन्हैय्या सोनवणे, करण शहा, सागर जगताप, मनजीत जांगीड इत्यादींनी परिश्रम घेतले.
केंद्रावर विसर्जन आरती करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचा नागरिकांनी लाभ घेतला. युवाशक्तीचे 50 स्वयंसेवक, रामानंद पो.स्टे. चे 10 कर्मचारी, पुजा विधीसाठी ब्राह्मण, निर्माल्य संकलनासाठी मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.


Next Post
जामनेर-भुसावळ रस्त्याची दयनीय अवस्था

जामनेर-भुसावळ रस्त्याची दयनीय अवस्था

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group