• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन ; दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 12, 2024
in जळगाव जिल्हा
0
महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन ; दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध

जळगाव | दि. १२ जुलै २०२४ | जिल्ह्यात शेतकरी बांधवांसह विविध घटकांच्या विविध समस्या, अडचणी मागण्यासंदर्भात वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन तसेच तोंडी, लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन देखील अद्याप शेतकरी बांधवांच्या मागण्या संदर्भात शासनाची बोटचेपी भूमिका असल्याचा आरोप करत आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध केला.

बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असून जिल्ह्यात तिन मंत्री असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असताना महाविकास आघाडी बघ्याची भुमिका घेणार नाही. असा निर्धार जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, माजी नगराध्यक्ष करण पवार, सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जि.प. गट नेते शशी साळुखे आदींसह मान्यवर आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.

अधिकारी निरुत्तर झाल्याने नेत्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून तरी जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्याच्या सचिवांशी बोलत त्यावर योग्य तोडगा काढावा. त्याशिवाय धरणे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत. असा निर्धार व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनातील चार प्रमुख मागण्या..
१) दुधाला रू.३०/- प्रति लिटर भाव व रू.५/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील रु.५/- प्रति लिटर चे अनुदान मंजूर करावे.

२) जळगाव जिल्ह्यातील ६६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विमा नुकसान भरपाई शासनाने नाम मंजूर केलेले असून याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पिक विमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊन देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत तात्काळ नुकसान भरपाई मंजूर होणे बाबत.

३) जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला अनुदान कुठलेही निकष न लावता सरसकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे.

४) शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेल्या असून परंतु त्याचा लक्षात कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही तसेच ज्वारी साठवणे साठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी.
वरील मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हा महाविकास आघाडीचे सर्व नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्था धरणे आंदोलन करणार आहेत.

यावेळी माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, माजी महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा दूध संघ संचालक प्रमोद पाटील, उपजिल्हा प्रमूख महेंद्र पाटील, पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार, शशी साळुखे, नाना महाजन, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), दशरथ महाजन, शरद तायडे, सुनील महाजन, रमेश चव्हाण, काँग्रेसचे राहुल मोरे, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, भिमराव खलाणे, सविता कुमावत, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी,

उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, भाऊसाहेब सोनवणे, उमेश पाटील, महेंद्र चौधरी, दिलीप घोरपडे, साहेबराव चव्हाण, सुनील पाटील, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, रवी राजपुत, विजय लाड, सुभाष साखला, पद्माकर पाटील, नरेन जैन, मुकेश गोसावी, अनिल चव्हाण, प्रीतम शिंदे, प्रसिध्दी प्रमूख उमेश चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी,कार्यकर्ते हे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे रविवारी आयोजन

खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे रविवारी आयोजन

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group