• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 1, 2024
in आरोग्य
0
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जळगाव, दि.०१ – जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने वर्षाकाठी दीड कोटी लोकांचा आणि एकट्या भारतात १५ लाख जणांचा मृत्यू होतो. आपल्याला वाचविण्यासाठी आजच तंबाखू न खाण्याचा संकल्प करू या… असे अत्यंत कळकळीचे आवाहन जळगाव येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक नितीन विसपुते यांनी केले.

जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क आणि जैन फूडपार्क यासह सर्व आस्थापनांमध्ये ३१ मे हा जागतिक धुम्रपान निषेध व तंबाखूप विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांशी ते सुसंवाद साधत होते. जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथील डेमो हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रारंभी कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे यांनी प्रास्तविक करून वक्ते नितीन विसपुते यांचे परिचय करून दिला. प्लास्टिक पार्क येथील सिक्युरिटी ऑफिसर श्री. मॅथ्यू यांनी गुटखा खाल्याचे दुष्परिणाम सोदाहरण स्पष्ट केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी गार्डन विभागाचे जुने सहकारी दगडू सीताराम पाटील यांनी आपल्या व्यसनमुक्तीचे अनुभव कथन केले.

याच श्रुंखलेत जैन फूडपार्क येथील ओनियन ट्रेनिंग हॉल येथे सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान जैन अॅग्रिपार्क, जैन फूडपार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांना देखील विसपुते यांनी मार्गदर्शन केले. ‘प्रेमाची आणि झोपेची कमी’ हेच व्यसनाधिनतेचे प्रमुख कारण आहे. स्वतःवर खूप प्रेम करा. तंबाखू सोडायचा मंत्र किंवा सिम्पल फंडा त्यांनी उपस्थितांना दिला; तो असा की, प्रत्येक एक तासाला एक ग्लास पाणी प्यावे, एक तास व्यायाम करावा आणि एक तास ध्यान करावे. या गोष्टी केल्यावर कुठलेही व्यसन सहज सुटते असा आत्मविश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि मान्यवरांचा परिचय भूमिपुत्र संपादकीय विभागाचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी समन्वयाचे काम जैन फूडपार्क येथील मानवसंसाधन विभागाचे भिकेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमास एच आर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.आर. पाटील, एस.बी. ठाकरे, सुरक्षा विभागाचे प्रमुख आनंद बलोदी यांच्यासह जैन फूड पार्क येथील शंभरहून अधिक सहकारी उपस्थित होते.


 

Next Post
जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार.. – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार.. - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add