• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

छायाचित्रातून उलगडला जिगीषाचा नाट्यप्रवास

भाऊंच्या उद्यानातील गॅलरीत आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 14, 2024
in जळगाव जिल्हा
0
छायाचित्रातून उलगडला जिगीषाचा नाट्यप्रवास

जळगाव, दि. १४ – ‘परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवाच्या’ निमित्ताने जळगाव शहरातील भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीत जिगीषा संस्थेच्या नाट्यप्रवासाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त विजय वाकुलकर यांच्या हस्ते फीत कापून कऱण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिस शहा, अनिल कांकरिया, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, विनोद पाटील प्रा. मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

“जिगीषा” ही संस्था मराठी रंगभूमीवरील एक क्रियाशील संस्था म्हणून ओळखली जाते. मराठवाड्यातील संभाजीनगर येथे ४० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जिगीषाने उत्तमोत्तम नाटकांची, सिनेमांची निर्मिती केली असून हा संपूर्ण प्रवास छायाचित्रातून उलगडण्यात आला आहे. या छायाचित्रांचे प्रदर्शन म्हणजे जिगीषाचा जिवंत प्रवास आहे असे मत माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवाचे आज उद्घाटन..
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सायं. ५ वा गणपती नगर मधील रोटरी हॉल येथे होणार असून जिगीषाचे प्रमुख जेष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, जेष्ठ नाट्यलेखक प्रशांत दळवी व अजय आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रसंगी “प्रवास जिगीषाचा, अनुभव आमचा” या विषयावर चर्चा होणार असून यात नाटककार प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते संदिप मेहता, अजय आंबेकर, हर्षल पाटील यांचा सहभाग असणार आहे. या उपक्रमाला रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व रोटरी क्लब गणपती नगर यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाला रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिल कांकरिया, अनिस शहा, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, छबीराज राणे, नारायण बाविस्कर, शंभू पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मंजुषा भिडे, सुदिप्ता सरकार, होरिलसिंग राजपूत, विनोद पाटील, प्रा. मनोज पाटील, मंगेश कुलकर्णी, अभिजीत पाटील, सुनील बारी, राहुल निंबाळकर, प्रवीण पाटील, अंजली पाटील, नेहा पवार, अक्षय नेहे, लीना लेले हे प्रयत्नशील आहेत.


 

Next Post
प्रवाशाची लुटमार प्रकरणी रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराला अटक

प्रवाशाची लुटमार प्रकरणी रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराला अटक

ताज्या बातम्या

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुन्हे

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

April 24, 2026
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 24, 2026
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा
जळगाव जिल्हा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

April 24, 2026
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

April 24, 2026
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर
क्रिडा

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

April 23, 2026
बालक पालकांसाठी रंगणार ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
जळगाव जिल्हा

बालक पालकांसाठी रंगणार ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group