• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

जळगाव दि.०६ – भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा हेच आहे. भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती असे म्हणतो. तेच सेवातत्व महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अवलंबले. सेवा परमोधर्म यातच सार्थकता मानले. हेच भगवत गीतेचे सार आहे.

समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन गांधी तीर्थ कस्तूरबा सभागृह केले होते. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. ‘मनमोहन’ ते ‘मोहनदास’ पर्यंतचा प्रवास त्यांनी सहज सोप्या भाषेत उलगडून दाखविला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, फाऊंडेशनच्या रिसर्च डीन गीता धरमपाल उपस्थित होते. श्रीवत्स गोस्वामी यांचे स्वागत सूतीहार, महात्मा गांधीजींचा पुतळा, शाल देऊन अशोक जैन यांनी केले.

श्रीवत्स गोस्वामी पुढे म्हणाले की, हिंदूचे तीर्थ हे जलाधिष्ठीत आहेत तर जैनांचे तीर्थ पर्वताधिष्ठीत आहे. गांधी तीर्थ हे मात्र जल आणि पर्वत या दोन्ही मिळून बनलेले आहे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचे ठरते. याठिकाणी ज्ञान मिळते आणि ज्ञान असेल तरच सेवा घडते हे मानवतेचे मूळ लक्षण होय. भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी यांच्यातील साम्य दर्शविताना एकादशी, वैष्णव, वैश्य आदींचे संदर्भासहित दाखले दिलेत. प्रकृती साकार करण्यासाठी मानवतेला धरून अन्यायाला विरोध करण्यासाठी महाभारत असो की सत्याग्रह हा धागा श्रीवत्स गोस्वामी यांनी समजून सांगितला. धर्मनिरपेक्षता हा गुण भगवत गीतेतून महात्मा गांधी यांनी स्वत: आचारणात आणला असेही ते म्हणाले. हीच शिकवण गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनीही कर्मातून आचरणात आणली. उजाड माळरानावर सिंचनातून नंदनवन फुलवले. ते स्वर्गाहून कमी नाही. आपल्या दूरदृष्टीतून पाणी, माती निसर्गाची भवरलाल जैन यांनी सेवा केली.

▪️ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लीलांची अनुभूती..
ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लिलांची अनोखी प्रस्तूती नृत्यांगना विष्णुप्रिया गोस्वामी यांनी केली. ओडिसी नृत्यातून श्रीकृष्णाच्या बाललिला, गोकूळ, वृदांवनातील विविध दाखल्यांवर नृत्याभिनय सादरीकरण केले. यात ‘केळ छंद जाने लो नंद राजा राम लिया..’ या उडिया भाषेतील वनमाली रचीत रचनेवर ओडिसी नृत्य सादर केले. ही राग केदारगौड ताल गुरू सात मात्रमध्ये सादर केले. यानंतर ‘राधाराणी सांग नावे मुरलीपारो’ या गीतावर मनमोहक नृत्य केले. शेवटी ‘वैष्णव जन तो है पिर..’ या महात्मा गांधी प्रिय भजन वरूण नेवे याने गायले. त्यावर विष्णुप्रिया गोस्वामी हिने ओडिसी नृत्य प्रस्तूत केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलनानंतर प्रशांत सूर्यवंशी यांनी संत कबीरांची रचना सादर केली. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. आभार गिरीष कुळकर्णी यांनी मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.


 

Next Post
मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ. केतकी पाटील

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणात गतिमानता - डॉ. केतकी पाटील

ताज्या बातम्या

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

June 10, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group