• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

जळगाव, प्रतिनिधी : लाचखोरीच्या प्रकरणात यापूर्वी कारवाई झालेल्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला पुन्हा लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर २०० रुपये घेण्याचे निश्चित झाले आणि ते स्वीकारताच एसीबीने कारवाई केली.

भगवान रोहिदास गायकवाड (५१, भुसावळ) असे कारवाई झालेल्या भूकरमापकाचे नाव आहे. जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारी ही कारवाई झाली. नेरी बुद्रूक येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने शेतीची मोजणी करण्यासाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक आणि टिपण उतारा मिळविण्यासाठी २ सप्टेंबरला अर्ज केला होता. या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी गायकवाड यांनी ७०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने एसीबीकडे केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारण्यास गायकवाड यांनी सहमती दर्शविली. ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना पकडले.

१४ वर्षांनी पुन्हा एसीबीच्या जाळ्यात..
गायकवाड यांच्याविरुद्ध २०१२ मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आता १४ वर्षांनी पुन्हा लाचखोरीच्या प्रकरणात ते एसीबीच्या कारवाईला सामोरे गेले आहेत. पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहिले. हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.


 

Next Post
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add