• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 9, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

जळगाव, प्रतिनिधी : भारतीय संस्कृती, कला, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांची विद्यार्थ्यांना अनुभूती देतानाच ‘करून शिकणे’ या अनुभवात्मक शिक्षणपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे ८ व ९ सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

गिरीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व महेंद्र कुंभार यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी नैसर्गिक मातीला आपल्या हातांनी आकार देत आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. मातीचा पोत व गुणधर्म समजून घेत तिचे विविध आकारांमध्ये रूपांतर करताना विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती, कलात्मकता आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार केला.

मूर्ती निर्मितीसोबतच गणेशस्तुती, श्लोक व स्तोत्रांच्या सामूहिक पठणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, निरीक्षणक्षमता, सूक्ष्म शारीरिक कौशल्य, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास यांचा विकास झाला. स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी मनापासून अनुभवला.

‘मातीपासून मूर्ती आणि मंत्रातून चेतना!’ हा भारतीय परंपरेतील सुंदर विचार या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यात आला. शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळविणे नव्हे, तर संस्कृती अनुभवणे, मूल्ये जगणे आणि सृजनातून स्वतःचा शोध घेणे, हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वीआयोजनासाठी स्कुलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका निशा जैन यांचे मार्गदर्शन लाभले.
अजय काळे, विक्रांत जाधव, प्राचार्य मनोज परमार यांच्यासह शिक्षिका यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Next Post
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

ताज्या बातम्या

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add