• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 24, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात गटारींची अस्वच्छता, रस्त्यांवरील अतिक्रमण, धूळखात पडलेली वाहने आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय यांसारख्या समस्या निदर्शनास आल्या. यावर नाराजी व्यक्त करत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, विशाल भोळे, अंकिता पंकज पाटील, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेश कॉलनी चौकातील गुरुदत्त मंदिर परिसरात रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या बंद टपऱ्या तातडीने हटविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. प्रभागातील अनेक ठिकाणी गटारींची नियमित सफाई होत नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी गटारींवर अतिक्रमण झाल्याने स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले. या सर्व गटारींची तातडीने सफाई करून अतिक्रमणांची समस्या दूर करण्याचे आदेश आरोग्य व बांधकाम विभागाला देण्यात आले.

बजरंग बोगदा परिसरात पडून असलेले साहित्य, अतिक्रमणांचे निष्क्रिय सांगाडे आणि वाढलेले गवत तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. याच परिसरात विविध ठिकाणी तीन-चार चाकी वाहने बंद अवस्थेत धूळखात पडलेली आढळली. ही वाहने हटवून परिसर मोकळा करण्याची कार्यवाही करण्यास महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

पाहणीदरम्यान एका ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे आढळले. यावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित व्यक्तीला तातडीने नोटीस बजावून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गणेश कॉलनी परिसरातील श्रीहरी नगर येथे सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचीही महापौर दीपमाला काळे यांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबत नागरिकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.


 

Next Post
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

ताज्या बातम्या

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार
जळगाव जिल्हा

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

October 24, 2026
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन
क्रिडा

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

October 24, 2026
सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन
खान्देश

सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन

October 24, 2026
उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या
खान्देश

उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या

October 24, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add