जळगाव, प्रतिनिधी : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या खरेदी विभागातील अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट पराग गुलाबचंद जैन (कांकरिया) यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी घोषित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

पराग जैन यांनी “A Study of Complexity and Compliances of Licensing and Its Impact on Food Processing Industries in Jalgaon District” या विषयावर संशोधन केले. डॉ. निलीमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन प्रबंध पूर्ण केला.

जळगाव जिल्ह्यातील खाद्यप्रक्रिया उद्योगांना परवाने मिळविताना येणाऱ्या अडचणी, विविध नियमांचे पालन आणि त्याचा उद्योगांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे.
पराग जैन यांना पीएच.डी. पदवी घोषित झाल्याबद्दल डॉ. प्रशांत वारके, सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, अजित जैन आणि सीए उज्ज्वल पगारिया यांनी अभिनंदन केले आहे.









