• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण

३७ विज्ञानासह तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्टचा समावेश; अजित जैन यांच्याहस्ते उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 29, 2024
in जळगाव जिल्हा
0
विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण

जळगाव, दि.२८ – अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ३७ प्रोजेक्ट साकारले आहेत. समाज हितासाठी उपयुक्त असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेतून प्रोजेक्टच्या संकल्पनांवर काम केले. यात विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, अवकाश तंत्रज्ञान, रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटींगसह अन्य विषयांवर प्रोजेक्ट साकारण्यात आले आहेत.

अनुभूती निवासी स्कूलमधील असेंम्बली हॉलमध्ये हे प्रोजेक्ट ठेवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्याहस्ते फित सोडून आणि दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, अभंग जैन उपस्थित होते. दोन दिवस होणाऱ्या या प्रोजेक्ट सादरीकरणात इतर शाळांसाठी ‘सायन्स क्विझ’ आयोजित केली आहे.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून रोबोटिक लॅब सह आर्टिफियल तंत्रज्ञानासहन विद्यार्थांमध्ये संशोधात्मक वृत्तीला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जाते आहेत. वर्षभरात चांद्रयान-३, भूमिती व गणितीय प्रोजेक्ट, मायक्रोबॉयॉलाजी, मेडिकल टेक्नोलॉजी, इलेक्ट्रोेमॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. यात विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करत असतात. यावर्षी ३७ निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले आहेत. विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, बायोफर्टिलायझर, बेसिक रोबोटिक्स, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम्स, अंतराळ विज्ञान यांचा समावेश होता. यासोबतच पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित हे प्रोजेक्ट होते.

Next Post
ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group