• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले खडसेंनी पत्र

उष्माघातामुळे होणारा मृत्यू नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून पाच लाखाची मदत द्यावी.. - एकनाथराव खडसे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 18, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले खडसेंनी पत्र

जळगाव, दि. १८ – महाराष्ट्र राज्यात उष्माघात मुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. दरम्यान उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांच्या परिवारास शासनातर्फे आर्थिक मदत मिळणेसाठी तरतूद करावी याबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात लिहिताना त्यांनी, मागील ४ ते ५ दिवसापासून तापमानाचे प्रमाण जास्तच वाढलेले असून, जळगांव जिल्ह्यात तापमानाचा देशात उचांक गाठला आहे. उष्माघाताने जिल्ह्यातील बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असून, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा उल्लेख केला आहे.

त्याचबरोबर उष्माघातापासून संरक्षणासाठी शासनामार्फत वेळोवेळी जनजागृती करून सूचना करण्यात येतात परंतु, शेतकरी, शेत मजूर, बांधकाम मजूर ई. नाईलाजास्तव भर उन्हात आपले काम करावे लागते, व अश्या परिस्थितीत उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु सदर नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत पुरविण्यात येत नाही अथवा कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

तरी महाराष्ट्र राज्यात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून, मृतांच्या परिवारास शासनातर्फे कमीतकमी ५.०० लक्ष रुपये आर्थिक मदत मिळणेसाठी तत्काळ योग्यती तरतूद करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ संकल्पेत हास्य क्लब सहभाग

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ संकल्पेत हास्य क्लब सहभाग

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान
जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

May 2, 2026
जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

May 1, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
जळगाव जिल्हा

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

April 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group