• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत.. – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मस्कावद, खिरोदा, फैजपूर येथे पाहणी करून पशुपालकांशी साधला संवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 10, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत.. – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जळगाव, दि.१० – जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात आणावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी सांगितले.
मंत्री श्री. विखे पाटील यांनी मस्कावद, खिरोदा आणि फैजपूर येथे भेट देवून जनावरांवर झालेल्या लंपी स्कीन डीसिज बाधित गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. शिसोदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, लम्पी स्कीन डिसीज आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. या आजारामुळे मृत झालेल्या जनावरांचे पंचनामे करून नोंद ठेवावी. लम्पी स्कीन डिसीज वरील उपचाराची पद्धती निश्चित करून औषधोपचार करावेत.

लम्पी स्कीन डिसीजचा प्रसार होऊ नये म्हणून लसीकरण मोहीम अभियान स्तरावर राबवावी. तसेच पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याविषयावर जनजागृती मोहीम राबवावी. सर्व पशुचिकित्सालयात आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी पशुपालकांशी संवाद साधला. त्यांनी लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांमधील लक्षणे, आतापर्यंत केलेले औषधोपचार याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
महापौरांच्या घरावर गुलाल, फटाके फेकून घातला गोंधळ

महापौरांच्या घरावर गुलाल, फटाके फेकून घातला गोंधळ

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add