जळगाव, दि. १० – शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर गुलाल, फटाके आणि दगड फेक करून गोंधळ घातल्याचा प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एकिकडे शहरात गणेश विसर्जनानिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या घरासमोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना फटाके फोडू नका असे हटकले असता मंडळाचे कार्यकर्ते व महाजन परिवारामध्ये गोंधळ उडाला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे प्रकार जर शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या घरावर घडत असेल तर सामान्य नागरिकांचे काय ? जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का ? असा सवाल महापौर जयश्री महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केला.