• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एकाचदिवशी तीन गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 23, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
एकाचदिवशी तीन गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर

जळगाव, दि.२३ – रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा हे ब्रिद घेऊन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे पोहोचत आहे. खेड्यापाड्यात घेण्यात येत असलेल्या शिबिराद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अनेकांना गंभीर आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ल्यासह येण्यासाठी गाडीचीही व्यवस्था उपलब्ध करुन दिली जात आहे. दरम्यान मंगळवारी यावल तालुक्यातील कासारखेडा, भादली आणि मोहाडी येथे एकाचदिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

सुप्रिम कॉलनीतील शिबिराचा ११३ नागरिकांना लाभ..
जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील शिवाजी महाराज चौकात सोमवारी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी मुधमेह, रक्‍तदाब, टू डी इको तपासणी अगदी मोफत करण्यात आली. याप्रसंगी मेडिसीन तज्ञ डॉ.तेजस कोटेचा, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, डॉ.कल्पना देशमुख, इंटर्न हर्षल राणे, सिद‍्धार्थ सिंग, आकाशे रेंगे यांनी आलेल्या रुग्णांच्या समस्या जाणून घेत योग्य ते मार्गदर्शन केले.

शिबिरासाठी नर्सिंग स्टाफचेही सहकार्य लाभले असून शिबिरात ११३ नागरिकांनी लाभ घेतला असून ४२ रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला देण्यात आला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, टि.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ यांचे सहकार्य लाभले.

कासारखेड्यातील शिबिरांचा ग्रामस्थांना लाभ..
यावल तालुक्यातील कासारखेडा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात मंगळवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आ. रमेश विठ्ठल चौधरी, यावल-रावेर काँग्रेसचे गटनेते शेखर सोपान पाटील, चिंचोलीचे अनिल साठे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आर.जी.पाटील, उमाकांत रामराव पाटील, अनिल दंगल पाटील यांची विशेष उपस्थीती होती.

निशुल्क अस्थिरोग शिबिरामुळे भादलीकरांना दिलासा..
भादली येथे मंगळवारी निशुल्क अस्थिरोग निदान शिबिराला सुरुवात झाली. यात गुडघे दुखणे, पोटर्‍या दुखणे, सांधे दुखणे आदी हाडांसंबंधित विकारांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ.परिक्षीत पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच रुग्णांची तपासणीसुद्धा केली. या निशुल्क शिबिरामुळे भादलीकरांना दिलासा मिळाला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी टि व्ही पाटील, मकरंद महाजन यांनी प्रयत्न केले.

मोहाडीतील महिलांना स्त्रीरोग निदान शिबिराचा लाभ..
मासिक पाळीत वेदना होणे, अंगावरुन अतिप्रमाणात पांढरे पाणी जाणे, पोटदुखी, वंध्यत्व आदि प्रकारच्या स्त्रियांच्या आजाराचे निदान शिबिर मंगळवारी मोहाडी येथे घेण्यात आले. सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, रेसिडेंट डॉ.महेश देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी केली. यात महिलांनी महिलाच डॉक्टर असल्याने निसंकोचपणे समस्या सांगितल्यात, त्या जाणून घेत औषधोपचार आणि रुग्णालयात येवून काही तपासण्या करुन घेण्याचा सल्‍ला देण्यात आला. या शिबिराचा ७६ महिलांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी रवि तायडे यांनी परिश्रम घेतले. याशिवाय २४ मार्च रोजी कोरपावली, २५ मार्चला संग्रामपूर तालुक्यातील कवठळ, अमळनेर याठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


 

Next Post
सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group