• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

महापौर दीपमाला काळे यांचा प्रभाग १८ मधील पाहणी दौरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 4, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

जळगाव, प्रतिनिधी : महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) प्रभाग क्रमांक १८ मध्ये पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध भागांना भेटी देऊन स्वच्छता, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला.प्रभागात साफसफाईसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निदर्शनास आले, ज्यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रभागात स्वच्छता नियमित होत असून गटारीही वेळोवेळी काढल्या जात असल्याची माहिती यावेळी नगरसेवकांनी दिली.

महापौरांनी भापसे चौक आणि म्हाडा कॉलनी परिसरात पाहणी करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.म्हाडा कॉलनी परिसराची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर संताप व्यक्त करत त्यांनी नागरिकांना धारेवर धरले. “जळगावात पाणीसाठा कमी असून जून महिन्यापर्यंत दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते; अशा वेळी पाणी जपून वापरले पाहिजे, वाया का घालवता?” अशा कडक शब्दांत त्यांनी नागरिकांना सुनावले. तसेच, विनाकारण पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

भापसे अण्णा चौक परिसरासह वॉर्डांत पथदिव्यांची मोठी समस्या असून, दिवे अत्यंत कमी आणि मंद प्रकाश देत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या गंभीर तक्रारीची दखल घेत महापौरांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच पाणीपुरवठा विभागाला सार्वजनिक नळांना तोट्या बसवण्याबाबत आणि गजानन महाराज मंदिर चौकातील पाणीपुरवठा कार्यालयास भेट देऊन कामकाज पाहण्याचे आदेश दिले.

​या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेविका अनिता भापसे, नलुबाई सोनवणे, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

"वॉटर मीटर" मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
जळगाव जिल्हा

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 4, 2026
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश
खान्देश

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

November 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

November 4, 2026
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद
जळगाव जिल्हा

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

November 4, 2026
एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात
जळगाव जिल्हा

एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add