• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय,महादेव रूग्णालय याठिकाणी डॉ. वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आगमन झाल्यानंतर डॉ. वर्षा पाटील यांच ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत करण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डिएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. सौरभ पाटील यांच्यासह डीन डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मुख्य लेखापाल योगेश पाटील,डॉ. सी.डी. सारंग, डॉ. दिलीप ढेकळे, अ‍ॅकेडमीक डीन डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. सुभाष बडगुजर, डॉ. मुकेश पाटील,रजीस्ट्रार, चेतन चौधरी, रजीस्ट्रार राहुल गिरी, यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातील डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गोदावरी फाउंडेशनच्या स्थापनेत डॉ. वर्षा पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. गोदावरी आजींशिवाय हा पहिला वाढदिवस साजरा होत असला तरी गोदावरी आजींचे आशीर्वाद त्यांना लाभत आहेत. डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रत्येक निर्णयात डॉ. वर्षा पाटील यांनी कायमच खंबीर साथ दिली आहे. सून, पत्नी, आई, सासू, आजी अशा विविध रूपात असलेल्या डॉ. वर्षा पाटील आपल्यासाठी रोल मॉडेल असल्याचे सांगत डॉ. प्रशांत सोळंके यांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

यानंतर बीएचएम, एमबीबीएस, आयुर्वेद कॉलेज, फिजीओथेरेपी कॉलेज, नर्सिंग कॉलेज, होमीओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, समूह नृत्य, गीत सादर केले. डॉ. केतकी पाटील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.तसेच रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रा.डॉ. पियूष वाघ, डॉ. विद्यानंद आठवले, डॉ. धनंजय बोरोले यांनी एकल गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्य व प्रमुखांनी डॉ. वर्षा पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राची मोराळे आणि उत्कर्ष भोसले याने मानले.


 

Next Post
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

ताज्या बातम्या

गुन्ह्यात जप्त ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

गुन्ह्यात जप्त ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add